Tuesday, 17 May 2011

मी



वाटेतले काटे खुडून चालतो मी
शब्द द्वेशाचे गाळून बोलतो मी.

आगीची काय दहशत दाखवीता
वीज ऊराशी घेऊन चालतो मी

पांडूरंग तिथे राहतो ऊभा
जिथे हात जोडून राहतो मी

फ़ुलांचे काय आमीश दाखवीता
माळ तार्‍यांची लेवून चालतो मी.

सिंहासनाचे नाही वेड मजला
सावळ्या मातीत धन्य पावतो मी.

बात कालची काय सांगता
स्वप्न उद्याचे चाळून पाहतो मी.

दिवस असा एकही जात नाही



जेव्हा तुमचे दिसणे होत नाही
रात्री डोळ्यांचे निजणे होत नाही.

जेव्हापासून भेट झाली आपूली
मंदिरात माझे जाणे होत नाही.

चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा
ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.

दर्पण तुम्हास मानले मी
आरशात माझे पाहणे होत नाही.

नाम आपूले सदा मुखात राही
देव-मंत्रे आता भजणे होत नाही.

दिवस असा एकही जात नाही
माझ्यात तुमचे असणे होत नाही.

मातृभूमी



कित्येक वेळी आली आम्हास
यमाची आमंत्रणे.
तुझियाचसाठी भूमाते धारीली
रक्तांची आभूषणे.

कविता- जयेश मेस्त्री

आय मिस यू



थरथरणारा अंधार

घोंगावणारा वारा

फडफडणारे डोळे

हुरहुरणारे मन

बुडालेला सुर्य

वांझोटे आभाळ

हरवलेला चंद्र

डोळ्यांमध्ये फेसाळणारा,

तुझ्या
आठवणींचा समूद्र....आय मिस यू.....

................कवीता  -  जयेश मेस्त्री....

गोजिर्‍या रे माझ्या फुला



गोजिर्‍या रे माझ्या फुला,

सांगु कसे रे मी तुला.

न कळे तुला नयनांची भाषा.

न येते मला अधरांची भाषा.

मग सांगणे मज जमेल का?

न सांगता तुज कळेल का?

का हे दिवस असेच सरतील.

कुशीत माझ्या लाडके दुःख उरतील.

आणि हासत मी हा विरह प्राशिला.

गोजिर्‍या रे माझ्या फुला.

-------------------कवीता  -  जयेश मेस्त्रि--------------

प्रित


  

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.

कळले मला न काही.

कळले तुला न काही.

कळण्यासारखे आणि,

उरले आता न काही.

भर उन्हात कशी ही पावसाची सर आली

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली.

-------------------कवीता -  जयेश मेस्त्रि--------------

ये निद्रे मज बिलगून घे



ये निद्रे मज बिलगून घे.

तिच्या-माझ्या मिलनाची एकची जागा.

स्वप्न-नगरीच्या त्या सुंदर फ़ुलबागा.

मज प्रिये मिलन होऊ दे.

ये निद्रे मज बिलगून घे.

-------------------कवीता  -  जयेश मेस्त्रि--------------

माझे सुख



माझे सुख...... रुसले आहे माझ्यावर.

रुसून ते माझ्या, नशिबाच्या डहाळीवर जाऊन बसले,

अबोला धरून..........

मी किती समजवले, तरी समजलेच नाही.

शेवटी न राहून, मी आपले-पणाचा हात पुढे केला,

तर ते भुर्रर्रर्रर्रकन उडून गेले...

माझ्या नशिबाच्या डहाळीचा झुला करुन गेले,

माझे सुख.......

-------------------कवीता -  जयेश मेस्त्रि--------------

का?


                

तु माझी कुणी नाहीस,

तसा मी सुध्दा तुझा कुणी नाही.

तसे आपण दोघेही एकमेकांचे, कुणी- कुणीच नाही.

पण....... पण आयुष्याचा ग्रंथ वाचताना,

आपण दोघेही एकमेकांचे डोळे झालो होतो........

का?..........

------------------ कवीता  - जयेश मेस्त्रि---------------------

चाळीतले प्रेम



मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

माझा नंबर आला, तरी दुसर्‍यांना जाऊ द्यायचो.

आई दारातुनच ओरडायची.. "नालायका, हलकटा, बेशरमा,

पाणि तापुन गेलंय येऊन आंघोळ कर ना."

मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

तु यायचीस,

पैंजण वाजवत, भरलेली बादली घेऊन.

मॅक्षी सावरत, पारोशी सौंदर्य घेऊन.

तुझे केस विस्कटलेले असायचे.

माझ्या नजरा,

तुझ्या केसांना विंचरत असायचे.

तुझ्या डोळ्यातलं काजळ,

गालावर पसरलेलं असायचं.

मला पाहून, गालातल्या गालात हसायचं.

मी असाच वेडयासारखा तुझ्याकडे चोरून पहायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

एकदा कळलं, तुझं लग्न ठरलं.

काळीज तुटलं, माझं मन रडलं.

विचारात पडलो, आता काय करायचं?

सरळ जाऊन तुझ्या बाबांना भेटायचं?

तेवढयात मला कुसुमाग्रजांची ती कविता आठवली.

"प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं.

मातीमधे उगवून सुध्दा मेघापर्यंत पोचलेलं"....

... मी ठरवलं, तुला सगळं सांगायचं.

मोरासारखा छाती काढून, तुझ्या समोर ऊभं रहायचं....

.....त्याच रात्री तु माझ्या घरी,

लग्नाची पत्रीका घेऊन आलीस.

मी नजर भिडवताच, तु नजर खाली घातलीस.

माझ्या आईच्या पाया पडुन,...

"लग्नाला सगळ्यांनी यायचं हं", अशी म्हणालिस.

मी नजर भिडवताच, तु नजर खाली घातलीस.

जाताना तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत राहिलो.

दुखाच्या सागरात नि‌‍र्माल्यासारखा वाहत राहिलो.

मी असाच वेडयासारखा तुझ्याकडे चोरून पहायचो.

मी सकाळी चाळीच्या संडासाबाहेर, तुझि वाट पाहत असायचो.

------------------ कवीता - जयेश मेस्त्रि---------------------

माझी कविता

   माझी कविता

तुझ्याशी संवाद म्हणजे

एकप्रकारे शाब्दिक प्रणयच.

आणि या प्रणयमालेतुन

जन्माला आलेली अपत्य,

म्हणजेच माझी कविता.........

-------------कवीता  - जयेश मेस्त्री--------