Tuesday, 17 May 2011

मी



वाटेतले काटे खुडून चालतो मी
शब्द द्वेशाचे गाळून बोलतो मी.

आगीची काय दहशत दाखवीता
वीज ऊराशी घेऊन चालतो मी

पांडूरंग तिथे राहतो ऊभा
जिथे हात जोडून राहतो मी

फ़ुलांचे काय आमीश दाखवीता
माळ तार्‍यांची लेवून चालतो मी.

सिंहासनाचे नाही वेड मजला
सावळ्या मातीत धन्य पावतो मी.

बात कालची काय सांगता
स्वप्न उद्याचे चाळून पाहतो मी.

दिवस असा एकही जात नाही



जेव्हा तुमचे दिसणे होत नाही
रात्री डोळ्यांचे निजणे होत नाही.

जेव्हापासून भेट झाली आपूली
मंदिरात माझे जाणे होत नाही.

चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा
ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.

दर्पण तुम्हास मानले मी
आरशात माझे पाहणे होत नाही.

नाम आपूले सदा मुखात राही
देव-मंत्रे आता भजणे होत नाही.

दिवस असा एकही जात नाही
माझ्यात तुमचे असणे होत नाही.

मातृभूमी



कित्येक वेळी आली आम्हास
यमाची आमंत्रणे.
तुझियाचसाठी भूमाते धारीली
रक्तांची आभूषणे.

कविता- जयेश मेस्त्री

आय मिस यू



थरथरणारा अंधार

घोंगावणारा वारा

फडफडणारे डोळे

हुरहुरणारे मन

बुडालेला सुर्य

वांझोटे आभाळ

हरवलेला चंद्र

डोळ्यांमध्ये फेसाळणारा,

तुझ्या
आठवणींचा समूद्र....आय मिस यू.....

................कवीता  -  जयेश मेस्त्री....

गोजिर्‍या रे माझ्या फुला



गोजिर्‍या रे माझ्या फुला,

सांगु कसे रे मी तुला.

न कळे तुला नयनांची भाषा.

न येते मला अधरांची भाषा.

मग सांगणे मज जमेल का?

न सांगता तुज कळेल का?

का हे दिवस असेच सरतील.

कुशीत माझ्या लाडके दुःख उरतील.

आणि हासत मी हा विरह प्राशिला.

गोजिर्‍या रे माझ्या फुला.

-------------------कवीता  -  जयेश मेस्त्रि--------------

प्रित


  

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली,

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.

कळले मला न काही.

कळले तुला न काही.

कळण्यासारखे आणि,

उरले आता न काही.

भर उन्हात कशी ही पावसाची सर आली

दोन वेगळ्या तनूंची एक वेल झाली.

जेव्हा तुझी नी माझी अशी प्रित झाली.

-------------------कवीता -  जयेश मेस्त्रि--------------

ये निद्रे मज बिलगून घे



ये निद्रे मज बिलगून घे.

तिच्या-माझ्या मिलनाची एकची जागा.

स्वप्न-नगरीच्या त्या सुंदर फ़ुलबागा.

मज प्रिये मिलन होऊ दे.

ये निद्रे मज बिलगून घे.

-------------------कवीता  -  जयेश मेस्त्रि--------------